Latest Marathi News

BREAKING NEWS

जत तालुक्यावर कर्नाटक सरकारचा दावा: कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई!

0 462

जत: कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जत तालुक्यावर दावा करण्याच्या तयारीत आम्ही आहोत, असे खळबळजनक वक्तव्य केले आहे.या मुद्द्यावर आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत, असं कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

 

Jawale Jewellers

माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील जत तालुका हा दुष्काळी तालुका आहे. या दुष्काळी गावातील कर्नाटक सीमा भागातील चाळीस गावे पाण्यापासून वंचित आहेत. या गावांनी पाण्यासाठी लढा दिला अनेक बैठका झाल्या मात्र अद्यापही या गावांना पाणी मिळाले नाही. जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी जत ते सांगली असा पायी मोर्चा काढून आम्हाला कर्नाटकात जाण्याची परवानगी द्यावी असा ठराव केला होता.मात्र अद्याप पाणी मिळाले नाही. यावर मंत्रालयात बैठका ही झाल्या. आता कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनी या चाळीस गावांना पाणी देण्याचे विचार करत आहे. महाराष्ट्रातील जत तालुक्यावर दावा सांगण्याचा कर्नाटक सरकारने गंभीरपणे विचार करीत आहे, असे खळबळजनक विधान कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलं आहे.

Manganga

 

 

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर नुकतीच एक बैठक झाली. मुख्यमंत्री शिंदे या प्रश्नावरून देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार होते. मात्र कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काय भूमिका असेल, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.