Latest Marathi News

BREAKING NEWS

‘शिंदे-भाजप सरकार लवकरच कोसळण्याची राजकीय पडद्यामागे तयारी होतेय’: ‘यांचे’ मोठे वक्तव्य!

0 426

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार तथा प्रवक्ते संजय राऊत यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना राज्यात पुढील दोन महिन्यांत काय होईल? असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना संजय राऊत यांनी ‘आम्ही राज्यात परिवर्तन घडवून आणण्याच्या कामाला लागलो आहोत’, असं सांगितलं आहे.

 

Jawale Jewellers

राउत म्हणाले, ‘रावसाहेब दानवेंनी सांगितलं आहे, दोन महिन्यात काय होईल सांगता येत नाही. याचा अर्थ त्यांना आमच्या हालचालीची बित्तंबबातमी कळलेली दिसते. भूगर्भात ज्या हालचाली सुरू आहेत, पडद्यामागे काही हालचाली सुरू आहेत, केंद्रीय मंत्री असल्याने त्यांच्या कानापर्यंत काही गोष्टी गेल्या असतील’ राज्यातील  शिंदे-भाजप सरकार लवकरच कोसळणार, पडद्यामागे राजकीय भूकंपाची तयारी होत आहे, असे संजय राऊत यांनी वक्तव्य केले आहे.

Manganga

 

Leave A Reply

Your email address will not be published.