Latest Marathi News

BREAKING NEWS

……मगच राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार?

0 302

मुंबई: शिंदे गट पुन्हा एकदा गुवाहाटीचा दौरा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. या दौऱ्यादरम्यान शिंदे गटाचे आमदार आणि खासदार कामाख्या देवीचे दर्शन घेऊन आल्यानंतर राज्यात शिंदे सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

 

Jawale Jewellers

माहितीनुसार, शिंदे गट २६ नोव्हेंबर रोजी त्यांच्या आमदार आणि खासदारांसह पुन्हा गुवाहाटीचा दौरा करणार आहे. या गुवाहाटी दौऱ्यात शिंदे गटाचे आमदार आणि खासदार हे कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहे. कामाख्या देवीचे दर्शन घेतल्यानंतर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशी माहिती समोर येत आहे.

Manganga

 

 

दरम्यान, शिंदे सरकारमधील काही आमदार मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असल्याची चर्चा होती. त्यानंतर आता शिंदे सरकारने नाराज आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.