Latest Marathi News

BREAKING NEWS

“मुख्यमंत्र्यांनी मला 50 नाहीतर 900 खोके दिले पण….”: आमदार प्रताप सरनाईक!

0 431

मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटातील आमदारांवर 50 खोके घेतल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून केला जात आहे. मात्र आता शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला 50 नाहीतर 900 खोके दिल्याचे म्हटले आहे.

 

Jawale Jewellers

सरनाईक म्हणाले, “कुणी 25 खोके म्हणतंय तर कुणी 50 खोके म्हणतंय, पण मला मुख्यमंत्र्यांनी 900 खोके दिले आहेत. 900 खोक्यांचा निथी त्यांनी विकासकामांसाठी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी 900 कोटी ठाणे महापालिका आणि 900 कोटी मीरा भाईंदर महापालिकेच्या विकासकामांसाठी असे 1800 कोटी रुपये दिले आहेत. या निधीमुळे रस्ते, सुशोभिकरण, पाड्यांचा विकास तसेच जनहिताची कामे होणार आहेत. या दोन्ही महापालिकांमधील विकासकामांसाठी याचा मोठा फायदा होणार आहे, असे प्रताप सरनाईक यांनी वक्तव्य केले आहे.

Manganga

 

Leave A Reply

Your email address will not be published.