Latest Marathi News

BREAKING NEWS

राज्यपाल कोश्यारी यांना पदावरून हटवण्यासाठी कोर्टात याचिका दाखल!

0 217

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता राज्यपालांना पदावरून हटवण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. दीपक दिलीप जगदेव यांच्या वतीने अॅड नितीन सातपुते यांनी ही याचिका दाखल केली आहे.

 

Jawale Jewellers

माहितीनुसार, विद्यमान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी जनतेतील एकोपा आणि शांतता बिघडवल्याचा याचिकेत आरोप करण्यात आला आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 61 आणि 156 अंतर्गत राज्यपालांविरोधात महाभियोगाची कार्यवाही करावी. याबाबत उच्च न्यायालयात फौजदारी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

Manganga

 

 

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांचा राज्यपालांनी अवमान केल्याचा याचिकेत ठपका ठेवण्यात आला आहे. लवकरच या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.