Latest Marathi News

BREAKING NEWS

श्रद्धा हत्याकांड: फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठा खुलासा; आफताबने सांगितले हत्येचे कारण!

0 616

मुंबई: श्रद्धा हत्याकांडाचा तपास करत असलेल्या दिल्ली पोलिसांना महत्त्वाचा पुरावा हाती लागला आहे. फॉरेन्सिक तपासणीत आफताबच्या बाथरुमच्या टाइल्सवर रक्ताचे नमुने आढळले आहेत.यापूर्वी फॉरेन्सिक टीमला स्वयंपाकघरात काही रक्ताचे डाग आढळले होते. फॉरेन्सिक तपासाशिवाय पोलिसांनी अधिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या सीएफएसएलकडून पुरावेही गोळा केले होते. मात्र, सीएफएसएलचा अहवाल येण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी लागतो.

 

Jawale Jewellers

तसेच, आफताबची पॉलीग्राफ चाचणी केल्यानंतर नार्को चाचणी केली जाईल. आफताबने दोन्ही चाचण्यांसाठी संमती दिली आहे.

Manganga

 

दरम्यान, यापूर्वी आफताबला साकेत न्यायालयात हजर करण्यात आले होते. कोर्टाने आफताबला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. कोर्टात न्यायाधीशांसमोर आफताबने रागाच्या भरात विचार न करता श्रद्धाची हत्या केल्याचे सांगितले. मात्र आता तो पोलीस तपासात सहकार्य करत असल्याची माहिती आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.