Latest Marathi News

BREAKING NEWS

24 वर्षीय तरुणाने पुलावरून मारली नदीत उडी; बघणारे व्हिडिओ काढण्यातच व्यस्त!

0 339

धुळे : शिरपूर ते शिंदखेडा रस्त्यावरील तापी नदीपुलावरुन 24 वर्षीय तरुणाने उडी घेऊन आत्महत्या केली. परंतु त्याला वाचवण्यापेक्षा बघणारे व्हिडिओ काढण्यातच व्यस्त राहिले. व तरुणाचा मृत्यू झाला.

 

Jawale Jewellers

माहितीनुसार, शिरपूर ते शिंदखेडा रस्त्यावरील तापी नदीपुलावरुन 24 वर्षीय तरुणाने उडी घेऊन आत्महत्या केली. पुलावरून जाणाऱ्या प्रवासीने तरुणाचा बुडतांनाचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केला. यावेळी संबंधित प्रवाशाने नदीपात्रात उडी मारलेल्या तरुणास बाहेर येण्यासंदर्भात आवाहन देखील केले. परंतु पाण्यात उडी घेतलेल्या तरुणाने नागरिकांतर्फे केले जात असलेल्या आव्हानाकडे दुर्लक्ष केले. काही काळ हातपाय हलवत पाण्यावर तरंगलेल्या तरुणाने काही वेळाने हातपाय हलवणे बंद केले व बघता बघता हा तरुण काही क्षणात पाण्यात बुडाला.

Manganga

 

दरम्यान, सुरेंद्र राजपूत असे संबंधित तरुणाचे नाव असून त्याचा तापी नदीपात्रात शोध सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.