Latest Marathi News

BREAKING NEWS

“गिरीश भाऊची गेस्टहाऊसवर काय भानगड झाली होती हे मी उघड्या डोळ्यांनी पाहिले”: एकनाथ खडसे!

0 307

जळगाव : एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांना मुलगा असता तर राजकारणात आला असता आणि सूनही राजकारणात आली असती असे म्हंटले होतं. यावरून महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्या मुलाचा मृत्यूवर प्रश्न उपस्थित करत आत्महत्या की खून झाला याचा शोध घ्यावा लागेल असे म्हणत मला बोलायला लावू नका असे म्हंटले होतं. यावरून खडसे कुटुंबाला वेदना झाल्याचे स्वतः खडसे यांनी सांगितले आहे. पण याच दरम्यान खडसे यांनी महाजन यांच्यावर एक गंभीर टीका केली आहे.

 

Jawale Jewellers

फर्दापूरच्या गेस्टहाऊसवर काय भानगड झाली होती, त्यावेळी मी देखील त्या गेस्टहाऊसवर होतो. मी अनेक कृत्ये उघड्या डोळ्यांनी पाहिली आहेत. तेव्हा पेपरमध्ये चवीने छापून यायचे. मी त्यावर काही बोललो नाही. गिरीश भाऊ यांचे अनेक प्रेम संबंध आहेत. याचा कधी उल्लेख मी केला नाही. एखाद्याचे प्रेमसंबंध असू शकतात, असे एकनाथ खडसे यांनी म्हंटले आहे.

Manganga
Leave A Reply

Your email address will not be published.