नवी दिल्ली: कतारमध्ये फीफा वर्ल्ड कप २०२० ही जागतिक फूटबॉल स्पर्धा सुरू आहे. सोमवारी ईरान आणि इंग्लंड या टीम समोरासमोर आल्या. ही मॅच इंग्लंड संघाने ६-२ असा मोठ्या फरकाने जिंकली. पण वर्ल्ड कपचा सामना सुरू होण्याआधी दोन्ही टीम हे आपापल्या देशाचं राष्ट्रगीत गातात, पण ईरानच्या संघानच आपल्याच देशाचे राष्ट्रगीत गायला नकार दिला आहे. याचं कारण म्हणजे ईरानमध्ये सुरू असलेले हिजाब विरोधी आंदोलन.
आपल्या देशातल्या महिलांचं समर्थन करण्यासाठी ईरानच्या संघाने फीफा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राष्ट्रगीत गायलं नाही. त्यामुळे आता या खेळाडूंवर ईरानी सरकारकडून कठोर कारवाई होऊ शतके अशी माहिती मिळत आहे.
दरम्यान, ईरानमध्ये या संघातील खेळाडूंच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. आपल्याच सरकारला आवाहन दिल्याबद्दल ईरानी खेळाडूंना तुरूंगात जावं लागू शकतं, किंवा त्यांना सरकारकडून नजरकैदेत ठेवलं जाऊ शकतं.