Latest Marathi News

BREAKING NEWS

पंतप्रधान मोदींना कुख्यात गुंड दाऊदचे 2 हस्तक मारणार?: पोलिसांना संदेश प्राप्त!

0 292

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचे दोन हस्तक मारणार असल्याची ध्वनीफी आणि मेसेज वाहतूक पोलिसांना व्हॉट्सअॅपद्वारे प्राप्त झाले. त्यात सात ध्वनीफीत असून संबंधीत व्यक्ती हिंदीमध्ये बोलत असल्याची माहिती समोर आली आहे.

 

Jawale Jewellers

माहितीनुसार, संदेशासोबत सुप्रभात बेज नावाचे आधार कार्डचे छायाचित्र, केरळ पोलीससंबंधीत छायाचित्र पाठवले होते. त्यांची तपासणी केली असता संबंधीत व्यक्ती दाउद इब्राहिम चे दोन हस्तक नामे मुस्तफा अहमद व नवाज हे असून ते प्रतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारणार आहेत तसेच देशात घातपात करणार असल्याचा संभाषण समोर आले आहे.

Manganga

 

दरम्यान, या संदेशानंतर पोलीस पथकांनी एका हिरे कंपनीच्या व्यवस्थापकाची चौकशी केली. त्यावेळी समुप्रभात बेज नावाचा व्यक्ती काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडे काम करत होता. पण त्या व्यक्तीला विविध भास होत असल्यामुळे त्याला कामावरून काढून टाकण्यात आल्याचे निष्पन्न झाले. संबधित फोन करणारी व्यक्ती मानसिक रुग्ण असल्याचे दिसत असून अधिक तपास पोलिस करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.