Latest Marathi News

BREAKING NEWS

आजचे राशीभविष्य, मंगळवार २२ नोव्हेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 688

 

Jawale Jewellers

मेष:-

Manganga

सामाजिक गोष्टींची जाणीव ठेऊन वागाल. निर्णय क्षमतेत सुधारणा होईल. नातेवाईकांची गाठ पडेल. अति तिखट पदार्थ खाऊ नका. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा.

 

 

 

वृषभ:-

प्रेमातील व्यक्तींना मनमोकळेपणाने बोलता येईल. तडकाफडकी निर्णय घेऊ नका. जुगारात चांगली कमाई करता येऊ शकेल. वाचनातून वैचारिकता सुधारेल. मुलांच्या वागण्याने खुश व्हाल.

 

 

मिथुन:-

तत्काल निर्णयावर येऊ नका. नोकरीत वरचष्मा राहील. सारासार विचारावर भर द्यावा. घरातील वातावरण आपल्याला अधिक आनंदी करेल. कामात काही सकारात्मक बदल दिसून येतील.

 

 

कर्क:-

अधिकार्‍यांवर छाप पाडता येईल. हस्त कौशल्याचे कौतुक केले जाईल. घरगुती खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रगती च्या दृष्टीने पाऊल टाकाल. मित्रमंडळींच्या सहवासात रमून जाल.

 

 

सिंह:-

नोकरदारांच्या अधिकारात वाढ होईल. सर्वांशी गोडीने सुसंवाद साधाल. आवडीचे पदार्थ चाखाल. हातातील अधिकार वापरता येतील. व्यापारी क्षेत्रात चटकन विश्वास ठेऊ नका.

 

 

कन्या:-

रुचकर भोजनाचा आनंद घ्याल. आपल्या मर्जीचे आपणच मालक असाल. मानसिक प्रसन्नता लाभेल. मनाजोगी खरेदी करता येईल. दिवस शुभ ठरेल.

 

 

तूळ:-

पोटाचे विकार जाणवू शकतात.  योग्य तरतूद करण्याकडे कल राहील. क्षुल्लक समस्या सोडवू शकाल. उगाच फार काळजी करत बसू नका. सारासार विचाराशिवाय निर्णयापर्यंत पोहोचू नका.

 

 

वृश्चिक:-

साहस आणि पराक्रमात वाढ होईल. लोकांच्या गळ्यातील ताईत बनाल. मनातील इच्छा पूर्ण कराल. एखादी बहुमूल्य वस्तु मिळण्याचे संकेत मिळतील. नोकरदाराच्या अधिकारात वाढ होईल.

 

 

धनू:-

नवीन काहीतरी संशोधन करण्याकडे कल राहील.  सामाजिक कामाची ओढ लागेल. प्रलंबित येणी मिळतील. घरात कामाचा बोजा वाढेल. आध्यात्मिक ज्ञानात भर पडेल.

 

 

मकर:-

गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल. मन:शांति लाभेल. जुन्या चिंता मिटतील. व्यावसायिक बदल नियोजनाबद्ध असावेत. लोकांच्या प्रशंसेस पात्र व्हाल.

 

 

कुंभ:-

घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा. नवीन गुंतवणूक करता येईल. नसत्या भानगडीत अडकू नका. मानसिक स्वास्थ जपावे. उगाचच चिडचिड करू नये.

 

मीन:-

आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. बोलताना संपूर्ण विचार करूनच बोला. पचनाचा त्रास संभवतो.  अति साहस करायला जाऊ नका.  आपल्यामुळे कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या.

 

Leave A Reply

Your email address will not be published.