Latest Marathi News

BREAKING NEWS

राजेवाडी येथे ट्रक ड्रायव्हरकडून सहकाऱ्याचा खून : आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल : आरोपीस अटक

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील राजेवाडी गावाच्या हद्दीमध्ये राजेवाडी-हिंगणी रोड वर असणाऱ्या वीट भट्टीवर ट्रक ड्रायव्हरकडून त्याच्या सहकाऱ्याचा खून करण्यात आल्याची घटना घडली.

0 2,573

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील राजेवाडी गावाच्या हद्दीमध्ये राजेवाडी-हिंगणी रोड वर असणाऱ्या वीट भट्टीवर ट्रक ड्रायव्हरकडून त्याच्या सहकाऱ्याचा खून करण्यात आल्याची घटना घडली.

Jawale Jewellers

याबाबत अधिक माहिती अशी, आटपाडी तालुक्यातील राजेवाडी येथे चंद्रकांत भोसले यांनी वीटभट्टी आहे. या वीट भट्टीवर दगडी कोळाची राख पोहच करण्यासाठी ट्रक घेवून चालक गणेश उत्तमराव मुंगल (व.व.३३) रा. धानोरा. ता. अर्धापूर, जि. नांदेड व त्याचा सहकारी हणमंत लक्ष्मण नागरगोजे (व.व.३३) रा. धानोरा ता. लोहा हे आले होते.

Manganga

परंतु त्यांच्यात अज्ञात कारणावरून वाद झाला. यावेळी आरोपी गणेश उत्तमराव मुंगल याने ट्रकमधील लोखंडी टामीने हणमंत नागरगोजे याला मारहाण केली. या मारहाणी मध्ये हणमंत याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा या मारहाणीमध्ये मृत्यू झाला. सदरची घटना ही दिनांक २१ रोजी चार सुमारास राजेवाडी गावच्या हद्दीमध्ये घडली.

याप्रकरणी वीटभट्टी चालक चंद्रकांत भोसले यांनी आटपाडी पोलिसात आरोपी विरुद्ध फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. सदर घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक मेमाणे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.