Latest Marathi News

BREAKING NEWS

श्रद्धा हत्या प्रकरणी आफताबची होणार खोटे पकडणारी ‘पॉलिग्राफ टेस्ट; काय आहे पॉलिग्राफ टेस्ट ,जाणून घ्या….!

0 345

मुंबई: पोलिसांना श्रद्धा हत्या प्रकरणी मारेकरी आफताब पोलिसांच्या ताब्यात असला तरी श्रद्धाशी संबंधित कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. त्यामुळे पोलिसांनी आज न्यायालयाकडे पॉलिग्राफ टेस्ट करण्याची परवानगी मागितली आहे. दरम्यान, न्यायालयाने या अगोदरच पोलिसांना आफताबची नार्को टेस्ट करण्याची परवानगी दिली आहे.तर आज न्यायालयाने पॉलिग्राफ टेस्ट करण्यास परवानगी दिली, तर येत्या काही दिवसात आफताबची पॉलिग्राफ टेस्ट होईल.

 

Jawale Jewellers

काय आहे पॉलिग्राफ टेस्ट?
आफताबने हत्या करून मृतदेहाचे तुकडे कोठे फेकले, याचा तपास सुरू आहे. आफताब पोलिसांपासून कोणत्या गोष्टी लपवत आहे आणि इतर सत्य जाणून घेण्यासाठी पोलिस त्याची नार्को टेस्ट करण्याची शक्यता आहे. मात्र, त्याची आता पॉलिग्राफ टेस्ट होण्याची शक्यता आहे.

Manganga

 

पॉलीग्राफ चाचणीला लायडिटेक्टर टेस्ट असेही म्हणतात. खोटे पकडण्यासाठी एक खास तंत्र आहे. यामध्ये आरोपी किंवा संबंधित व्यक्तीची चौकशी केली जाते आणि तो उत्तर देतो तेव्हा एका खास मशीनच्या स्क्रीनवर अनेक ग्राफ तयार होतात.

 

नाडी, हृदय गती आणि रक्तदाब यातील बदलानुसार आलेख वर खाली सरकतो. व्यक्ती खरे बोलत आहे की खोटे हे त्याच्या आलेखावरून समजते. ग्राफमध्ये असामान्य बदल दिसत असल्यास, याचा अर्थ ती व्यक्ती खोटे बोलत आहे.(सौ. साम)

 

Leave A Reply

Your email address will not be published.