Latest Marathi News

BREAKING NEWS

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी महावितरणाला दिल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना!

0 610

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी महावितरणाला महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांकडून सध्याचे बीलं घ्या, इतर वसूली नंतर घ्या. त्यांचं लगेच वीज कनेक्शन कापू नका, अशी सूचना देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना निश्चितच दिलासा मिळणार आहे.

 

 

“शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती पाहता आता रब्बीच्या पेरण्या किंवा नव्या पिकांसाठी प्रयत्न सुरु असतील, म्हणून मी महावितरणाच्या अधिकाऱ्यांना असं सांगितलं की, जे बील भरु शकतात त्यांनी बील भरलं पाहिजे. पण जे अडचणीत आहेत त्यांनी सध्याचं बील जरी भरलं तरी त्यांना सूट देण्यात यावी. त्यांचं वीज कनेक्शन तोडू नये, भविष्यात त्यांच्याकडून आपल्याला वसूली करता येईल”, असं देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केले.

 

तसेच, “अतिवृष्टी झालेल्या भागात सक्तीची वसुली करु नये, केवळ एक बील घेऊन विषय बंद करायला मी सांगितलं आहे”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.