बीड: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर वक्तव्य केल्यामुळे बीडमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने चक्क राज्यपालांची काळी टोपी घेवून येणाऱ्याला व्यक्तीला एक लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केले आहे.
माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराजांवर वक्तव्य केल्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांकडून कोश्यारी यांच्यावर टीकेचा भाडीमार होत आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून बीडमध्ये भगत सिंह कोश्यारी यांच्या विरोधात जोडो मारो आंदोलन केले.
दरम्यान, यावेळी ‘राज्यपालांची काळी टोपी आणा, एक लाख रुपये मिळवा’ असं बक्षीस शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी घोषणा केली.