मुंबईः गेल्या दोन दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री रोहित पवार यांनीही राज्यपालांसह भाजपवर निशाणा साधला आहे.
आमदार रोहित पवार म्हणाले की, राज्यपालांसह भाजपच्या नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्य झाली तरी, आणि त्यांनी काहीही बोलले तरी त्यांच्याबद्दल भाजपचे नेते काहीच का बोलत नाहीत. तसेच, भाजपचे नेते दिल्लीत बसून काही विधानं करतात, आणि त्याला विरोध भाजपचे नेते इथून करतात. त्यांनी वादग्रस्त वक्तवय् केले तरी महाराष्ट्रातील भाजपचे नेते त्यांना विरोध का करत नाहीत. याचा अर्थ राज्यातील भाजप नेत्यांना त्यांची विधानं आवडतात का असा सवाल आमदार रोहित पवार यांनी केला आहे.