जकार्ता : इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे सोमवारी भूकंपाचे धक्के जाणवले. आजच्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.6 इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे. या भूकंपात जावामध्ये सुमारे 70 लोकांचा मृत्यू झाला असून किमान 400 लोक जखमी झाले आहेत.
हवामान आणि भूभौतिकीय एजन्सीनुसार, आजच्या भूकंपाचा केंद्रबिंदू पश्चिम जावामधील सियांजूर येथे जमिनीच्या 10 किमी खोलीवर होता.भूकंपामुळे सियांजूर येथील डझनभर इमारतींचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, ऑफिस किंवा घरामध्ये असलेल्या लोकांनी भूकंपाचे धक्के जाणवताच मोकळ्या जागी पळ काढला.