मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या बोलण्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप केला आहे.
भगतसिंह कोश्यारी यांनी सातत्याने महापुरुषांविषयी आक्षेपार्ह विधानं करतात. महात्मा फुलेंविषयी, शिवरायांबद्दल, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी जी आक्षेपार्ह विधानं करतात, ती दिल्लीश्वरांच्या इशाऱ्यावर करतात, कोश्यारी सातत्याने अशी गंभीर विधानं करतात. महाराष्ट्राचा अपमान करण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांना मी सांगू इच्छितो की, आम्ही त्यांना महाराष्ट्राचं पाणी पाजल्याशिवाय शांत बसणार नाही, असे दानवे यांनी वक्तव्य केले.