Latest Marathi News

BREAKING NEWS

 

गोष्टींची माहिती काढून घेण्यासाठी केलेली ‘नार्को टेस्ट’ म्हणजे नक्की काय , ते जाणून घ्या …!

0 570

मुंबई : नार्को टेस्ट एक ग्रीक शब्द आहे. याचा अर्थ एनेस्थेशिया किंवा टॉरपोर असाही होतो. या शब्दांचा वापर वैद्यकीय क्षेत्रात प्रामुख्याने केला जातो. बार्बिट्युरेट्स याचा विशेष वापर करुन साईकोट्रोपिक औषधं देत नार्को केली जाते. ही औषध माणसाला ग्लानी आणतात. या ग्लानीमध्ये माणूस पूर्णपणे बेशुद्ध नसतो आणि पूर्णपणे शुद्धीतही नसतो. ही त्याच्या मधली अवस्था असते.

 

 

या अवस्थेत माणूस काहीही विचार करण्याच्या किंवा कोणतीही गोष्ट समजून घेण्याच्या मनस्थिती नसतो. त्यामुळे अशा अवस्थेत व्यक्तीला काहीही विचारलं तर तो खरंच बोलेल, असं मानलं जातं.

 

माणूस शुद्धीत ज्या गोष्टींची उत्तर देणं टाळतो, अशा प्रश्नांची उत्तरं नार्को टेस्टच्या माध्यमातून मिळवता येऊ शकतात. पोलीस तपासात अनेकदा नार्को टेस्ट ही महत्त्वाची भूमिका बजावतात.

 

एनेस्थेशिया तज्ज्ञ डॉ. अभिषेक चंद्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या व्यक्तीची नार्को टेस्ट करायचीय, त्या व्यक्तीच्या नसांमध्ये सोडियम पेंटोथल, स्कोपोलामाईन आणि सोडियम अमायटलचं इजेक्शन दिलं होतं. एनेस्थिशियच्या माध्यमातून हे इंजेक्शन दिलं जातं.

 

या इंजेक्शनमुळे व्यक्तीला ग्लानी येण्यास सुरुवात होते. काही प्रमाणात तो बेशुद्ध असल्यासारख्या अवस्थेत असतो. पण तो पूर्णपणे बेशुद्ध झालेला नसतो.

 

फक्त ती व्यक्ती कोणताही विचार करण्यास त्या अवस्थेत असक्षम असते. अशा अवस्थेत सदर व्यक्तीला प्रश्नोत्तर केल्यास ती खरखरं बोलून टाकण्याची शक्यता दाट असते, असं जाणकार सांगतात.

 

झोपेसारख्या अवस्थेत नार्को टेस्ट करणाऱ्या व्यक्तीकडून असा गोष्टींची माहिती काढून घेण्याचा प्रयत्न असतो, ज्यावर शुद्धीत ती व्यक्ती बोलणं टाळेल, किंवा शक्यतो खरं सांगणार नाही. यासाठी नार्को टेस्टच्या दरम्यान, मॉल्यिक्युलर पातळीवर त्या व्यक्तीच्या नर्व्ह सिस्टममध्ये दखल देत सदर व्यक्तीचं अवघडलेपण कमी करण्याचाही प्रयत्न होतो.

 

डॉ. चंद्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या इंजेक्शनचं प्रमाण किती असावं, हे वैद्यकीय अहवालांवरुन ठवलं जातं. यात सदर व्यक्तीचं लिंग, त्याचं वय, प्रती, शरीराची स्थिती इत्यादी गोष्टींताही विचार केला जातो.
विशेष म्हणजे अतिशय तज्ज्ञ व्यक्तींच्या देखरेखी खालीच ही टेस्ट केली जाते. नार्को टेस्ट दरम्यान, पोलीस स्वतः व्यक्तीशी प्रश्न उत्तर विचारत नाहीत. डॉक्टर सदर व्यक्तीच्या हृदयाचे ठोके, रक्तदाब आदी पाहून पोलिसांनी ठरवून दिल्याप्रमाणे प्रश्न विचारतात.

 

या टेस्ट दरम्यान, पल्स रेट कमी होण्याचीही धास्ती असते. त्यामुळे तसं झाल्यास नार्को टेस्ट करणाऱ्या ऑक्सिजनही दिला जातो.

 

नार्को टेस्ट 100 टक्के खरी नसते?

नार्को टेस्टमध्ये आरोपी खोटं बोलू शकतो का, अशीही एक शंका उपस्थित केली जाते. ही शंका 100 टक्के खरी आहे. नार्को टेस्ट 100 टक्के खरी असण्याची कुणीच शास्वाती देऊ शकत नाही. अनेकदा आरोपीच्या चलाखीमुळे नार्को टेस्टही निरुपयोगी ठरतात.

 

असाच प्रकार निठारी कांड प्रकरणातही झाला होता. शिवाय नार्को टेस्टमध्ये देण्यात आलेली उत्तरं प्राथमिक साक्ष म्हणून कोर्टात वापरण्यात वैधही नसतात, असंही कायद्याचे जाणकार सांगतात.

 

विशेष म्हणजे नार्को टेस्ट करण्याआधी सदर व्यक्तीला नार्को टेस्ट बद्दल सगळी माहिती देणं बंधनकारक असतं. ही टेस्ट करण्यासाठी कोर्टाची परवानगी तर लागतेच, शिवाय ज्याची टेस्ट करायची आहे, त्याचीही परवानही घ्यावी लागते.

 

जर सदर व्यक्ती नार्को टेस्ट करण्यास राजी असेल, तर आधी त्या व्यक्तीची वैद्यकीय तपासणी होते. त्यानंतरही पुढील कारवाई केली जाते. महत्त्वाचं म्हणजे नार्को टेस्टचं व्हिडीओ रेकॉर्डिंगही केलं जातं.
नार्को टेस्टमध्ये विचारले जाणारे प्रश्न आधी पोलिसांकडून ठरवले जातात. हे प्रश्न नार्को टेस्ट करणाऱ्या जाणकारांच्या पथकाला दिले जातात. हेच प्रश्न सदर आरोपीला विचारणंही नार्को टेस्ट करणाऱ्यांना बंधनकारक असतं.

 

श्रद्धा हत्याप्रकरणातील आरोपी आफताबची आज नार्को टेस्ट होणार असल्याचं वृत्त समोर आलंय. या नार्को टेस्टमध्ये श्रद्धा हत्याकांडाचा छडा लावण्यासाठी महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी पोलीस खालील प्रश्न आरोपी आफताबला विचारण्याची दाट शक्यता आहे.

 

आफताबला कोणते प्रश्न विचारणार?
1. श्रद्धाची हत्या केव्हा आणि का केली? या हत्याकांडाच अजून कुणाचा हात आहे?
2. श्रद्धाचं शिर आणि धड यांचे तुकडे करुन कुठे कुठे फेकलं?
3. श्रद्धा आणि तुझे कपडे कुठे ठेवलेस?
4. ज्या हत्याराने श्रद्धाचे तुकडे केलेस, ते हत्यार कुठंय?
5. श्रद्धाचा मोबाईल कुठं आहे? (tv9 मराठी)

Leave A Reply

Your email address will not be published.