औरंगाबाद: औरंगाबादेमधील आपतगाव येथे एका पतीने आपल्या पत्नीची गळा आवळून हत्या केली. व पत्नीची हत्या केल्यानंतर हा आरोपी स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाला आहे. सुनीता कडूबा हजारे असे मृत महिलेचे नाव आहे. तर, कडूबा भागाजी हजारे असे हत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, आपल्या पत्नीचं कुटुंबातील कोणत्याही सदस्यांसोबत जमत नसल्याने पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केली आहे. केल्यानंतर पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलीस ठाण्यात येऊन त्याने साहेब, “रोजची कटकट एकदाची संपवली” असं म्हणत पत्नीच्या खुनाची कबुली दिली. त्यानंतर या घटनेचा खुलासा झाला.
दरम्यान, या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सोमवारी मृतदेहाचे शवविच्छेदन केले जाणार आहे.