Latest Marathi News

BREAKING NEWS

‘त्या’ लिपस्टिकवालीला काय कळतं?, घेऊन फिरतील तिला…: चंद्रकांत खैरे यांचा ‘या’ महिला नेत्यावर निशाणा!

0 458

औरंगाबाद: ठाकरे गटाचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिपाली सय्यद यांनी सुषमा अंधारे आणि नीलम गोऱ्हे या चिल्लर नेत्या असल्याचं म्हटलं होतं. हाच धागा पकडून चंद्रकांत खैरे यांनी अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्यावर निशाणा साधला आहे. ही टीका करताना चंद्रकांत खैरे यांची जीभ घसरली.

 

Jawale Jewellers

चंद्रकांत खैरे म्हणाले, “सुषमा अंधारे यांचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षण झालेलं आहे. दसरा मेळाव्याला मी त्यांना सांगितलं तुमचं अप्रतिम भाषण झालं. त्यावेळी त्या म्हणाल्या, साहेब, तुम्ही शिवसेना प्रमुखांचा वाढदिवस साजरा करत होते. तुम्ही एकांकीका स्पर्धा भरवल्या होत्या. तेव्हा माझ्याकडे कॉलेजची फी भरायला पैसेही नव्हते. तेव्हा मी प्रचंड अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. मी दोन्ही स्पर्धेत भाग घेतला आणि दहा हजार रुपये पारितोषिक मिळवले… अशा या ताई आहेत. त्या लिपस्टिकवालीला काय समजतं? घेऊन फिरतील तिला. आता तिला पक्षात घेतही नाहीत ते, असा टोला त्यांनी लगावला.

Manganga

 

दरम्यान, सध्या औरंगाबादेत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वाखाली महाप्रबोधन यात्रा सुरू आहे, यावेळी ते बोलत होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.