पुणे : “शिवाजी महाराज तो पुराने जमाने के आदर्श है, अभी तुम्हारे सामने नितीन गडकरी जैसे आदर्श है, असं वादग्रस्त वक्तव्य राज्यपालांनी केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे.
आज पुण्यात शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वारगेट येथील सावरकर पुतळ्याजवळ राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने डमी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना आणत त्यांना उठाभाषा काढायला लावण्याबरोबरच त्यांचं धोतर फेडत अनोख्या पद्धतीने आंदोलन केला आहे.
दरम्यान, महाराष्ट्राच्या शिवप्रेमींची तुम्ही परीक्षा बघू नका. राज्यपालांची जर पुढच्या दोन दिवसात बदली केली नाही तर या महाराष्ट्रातील शिवप्रेमी राज्यपाल जिथं दिसतील तिथे त्यांचं धोतर भेटतील. याची सर्वस्वी जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारची राहील असा इशारा प्रशांत जगताप यांनी दिला आहे.