जुन्नलर : जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील कुकडेश्वर येथे घराजवळील विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या पत्नीला विहिरीतून वाचविताना पती– पत्नी दोघांचाही बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. सहा महिन्यांपूर्वीच सागर बाळू दिवटे व नाजूका सागर दिवटे या दोघांचे झाले होते.
माहितीनुसार, कुकडेश्वर येथील विहिरीवर घरातील कपडे अंथरुण व कपडे धुण्यासाठी दिवटे कुटुंबातील नवविवाहित महिला गेली होती. यावेळी विहिरीच्या कडेवर पाण्याने ओलसर भाग झाल्याने कपडे धुताना तिचा पाय घसरुन विहिरीत पडली. यावेळी वाचविण्यासाठी नाजिका दिवटे यांनी आरडा ओरड केली. पत्नीचा आवाज आल्याने पती सागर धावत येऊन पत्नी नाजुकाला वाचविण्यासाठी विहिरीत उडी मारली. मात्र पोहण्याचा सराव नसल्याने दोघांचाही पाण्यात बुडुन मृत्यु झाला.
दरम्यान, विहिरीच्या काठावर गाणे सुरू असलेला मोबाइल व विहिरीत तरंगणारी बादली दिसल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.