जालना: जालना येथील एका गावात विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्यानंतर या घटनेच्या संदर्भातील ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली.दरम्यान, समाजात आपली बदनामी होईल या भीतीनं पीडितेच्या पतीने आत्महत्या केली. पीडित महिलेने पारध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, या घटनेत तीन पुरुष, तर दोन महिला सहभागी आहेत. यातील दोन आरोपींनी आणि त्यांच्या साथीदार दोन महिलांनी एकाला फोनवर बोलण्यास महिलेला भाग पाडलं. तसेच त्यांनी पीडितेला गुंगीचे ओषध दिले. बेशुद्ध पडल्यानंतर तिच्यावर सामूहिक अत्याचार केले. नराधमांनी या घृणास्पद कृत्याचा व्हिडिओही काढला होता. आरोपींनी पीडितेच्या पतीला आणि गावातील इतर व्यक्तींना सेशल मीडियाद्वारे ती ऑडिओ क्लिप पाठवली आणि व्हायरल केली. हा धक्का पीडितेच्या पतीला सहन झाला नाही. त्यामुळे त्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली.
दरम्यान, या घटनेनंतर पीडितेने नोंदवलेल्या तक्रारीनुसार ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पारध पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.