मुंबई: आज सकाळी राऊत यांनी एक सूचक ट्विट केलं. काल म्हणजे, रविवारी मध्यरात्री काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा मला फोन आला होता, असे ट्विट राऊतांनी केले आहे.
‘भारत जोडोत व्यस्त असूनही राहुल गांधी यांनी रविवारी रात्री फोन करुन माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. आम्हाला तुमची चिंता होती. असे म्हणाले. राजकारणातील सहकाऱ्यास खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात 110 दिवस यातना दिल्या याचे दु:ख वाटणे हीच माणुसकी आहे. हा ओलावा संपला आहे. यात्रेत तो दिसतोय’, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.
दरम्यान, मी तुरुंगात असताना किती लोक माझ्या घरी आले? मला माहीत आहे. किती लोकांनी चौकशी केली मला माहीत आहे. ठाकरे परिवार, आमचा पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील माझ्या सहकाऱ्यांनी चौकशी केली, असे ही संजय राऊत यांनी वक्तव्य केले.