मेष:-
मनात आकर्षण भावना वाढू शकते. छोटे प्रवास घडतील. दिवस मनाजोगा जाईल. एखादी विशेष व्यवस्था करावी लागेल. समजुतीत बदल होण्याची शक्यता.
वृषभ:-
कौटुंबिक गोष्टीत दिवस जाईल. अचानक कौटुंबिक खर्च वाढू शकतो. नवीन करार पूर्णत्वास जाईल. घरात आनंदवार्ता मिळेल. दिवस चांगला जाईल.
मिथुन:-
महत्त्वाच्या गोष्टीत जोडीदाराचा सल्ला घ्यावा. निकाल तुमच्या बाजूचा असेल. घरात शिस्त बाळगाल. अचानक धावपळ करावी लागू शकते. नातेवाईक भेटायला येतील.
कर्क:-
प्रलंबित कामे मार्गी लावाल. तुमचे कौशल्य पणाला लावा. व्यावसायिक प्रगती करता येईल. नोकरीत उत्साही वातावरण राहील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील.
सिंह:-
मधुर वाणीने सर्वांची मने जिंकून घ्याल. आपल्याला आवडणार्या गोष्टीत अधिक लक्ष घालाल. मानसिक शांतता लाभेल. आत्मविश्वास वाढीस लागेल. वैवाहिक जीवन सुखमय असेल.
कन्या:-
एखाद्याकडून मदतीची अपेक्षा बाळगाल. आपल्यातील कालगुणांना वाव द्यावा. नसत्या काळज्या करू नका. मात्र कौतुकाची फार अपेक्षा करू नका. समोरील जबाबदारी उत्तमरित्या पेलाल.
तूळ:-
मित्रांच्या मदतीने एखादी योजना आखाल. आपले स्वत्व राखून बोलाल. एखादी भेटवस्तू मिळेल. बोलण्यात अधिकार वाणी ठेवाल. सामाजिक प्रतिष्ठा जपाल.
वृश्चिक:-
तज्ञ व्यक्तीचा सल्ला मोलाचा ठरेल. काही कामे उगाचच अडकून पडल्यासारखी वाटू शकतात. जुनी उधारी वसूल होईल. मन प्रसन्न राहील. दिवसभरात काहींना काही लाभ मिळेल.
धनू:-
कायदेशीर बाबीत सकारात्मकता दिसेल. स्वत:वरील विश्वास कायम ठेवावा. कौतुकास पात्र व्हाल. व्यावहारिक फसणूकीपासून सावध रहा. काही समस्यांचे निराकरण होऊ शकते.
मकर:-
जोडीदाराशी क्षुल्लक गोष्टीवरून मतभेद होऊ शकतो. अचानक धनलाभ संभवतो. आपल्या तत्वांना मुराद घालू नका. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल.
कुंभ:-
मानसिक प्रसन्नता लाभेल. वडीलधार्या व्यक्तींना नाराज करू नका. मित्रांचे भरपूर सहकार्य लाभेल. तुमचे संपर्क क्षेत्र वाढेल. जोडीदार तुमच्यावर खुश असेल.
मीन:-
नोकरदारांना दिवस चांगला जाईल. जुनी कामे मार्गी लावाल. सासुरवाडीची मदत मिळेल. जोडीदाराशी संघर्ष टाळावा. विवाह विषयक बोलणी पुढे सरकतील.