मुंबई: दुधाच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. दिल्लीतील मदर डेअरीने पुन्हा एकदा दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्यापासून नवीन दराने दूध खरेदी करावे लागणार आहे.
माहितीनुसार, मदर डेअरीने फुल क्रीम दुधाच्या दरात लिटरमागे एक रुपयांनी वाढ केली आहे. त्याचबरोबर टोकनयुक्त दुधाच्या दरात लिटरमागे २ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आता एक लिटर फुल क्रीम दूध ६४ रुपये झाले आहे. त्याचबरोबर आता टोकन दूध ५० रुपये प्रतिलिटर दराने उपलब्ध होणार आहे.
दरम्यान, मदर डेअरीने दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांकडून कच्च्या दुधाच्या खरेदीच्या खर्चात वाढ झाल्यामुळे ही दरवाढ करण्यात आली आहे.