Latest Marathi News

BREAKING NEWS

सांगली: सराफ दुकानातून कामगारानेच चोरी केले सव्वा नऊ लाखांचे दागिने; कामगारास अटक!

0 409

सांगली : सांगली शहरातल्या एका सराफ दुकानात कामगाराने ९ लाख रूपयांचे दागिने लांबविले होते. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास करत दागिने घेऊन पळून गेलेल्या कारागीरास अटक केली आहे.

 

Jawale Jewellers

माहितीनुसार, सांगली शहरातल्या गणपती पेठ या ठिकाणी असणाऱ्या गोल्ड स्मिथ सराफ दुकानांमध्ये उस्मानाली हा कामाला होता. दुकानांमध्ये कोणी नसल्याचा फायदा उठवत त्याने मंगळवारी सोन्याच्या दागिन्यांची चोरी करत पलायन केले होते. मात्र शहर पोलिसांनी अखेर त्याला अटक केली आहे.

Manganga

 

दरम्यान, सांगली शहर पोलिसांनी तपास करत उस्मानअली अलीमंडल या चोरी करणाऱ्या कामगाराला नांदेडमधून अटक केली आहे. त्याच्याकडून यावेळी सव्वानऊ लाखांचे 185 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.