मुंबई: राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर आता या वादात महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी सुद्धा उडी घेतली आहे.
तुषार गांधी म्हणाले, ‘सावकरकर यांनी केवळ इंग्रजांनाच मदत केली नाही, तर बापूंना मारण्यासाठी नथ्थुराम गोडसेला चांगली बंदूक मिळवून देण्यासाठी सु्द्धा मदत केली. बापूंच्या हत्येच्या दोन दिवस आधीपर्यंत नथ्थुराम गोडसेकडे कुठलंही शस्त्र नव्हतं’, असा आरोप महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केला आहे.
दरम्यान, आता तुषार गांधी यांच्या वक्तव्यावर राज्यभरातून काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.