Latest Marathi News

BREAKING NEWS

नवऱ्याच्या एक कोटीची लॉटरीचे पैसे घेऊन बायको प्रियकरासोबत फरार!

0 518

मुंबई: दक्षिण आशियाई देश थायलंडमध्ये एका गरीब व्यक्तीला १ कोटी रुपयांची लॉटरी लागली. या व्यक्तीने लॉटरीत जिंकलेले पैसे घेऊन त्याच्या पत्नीने प्रियकरासोबत धूम ठोकली. पत्नी आणि पैसे दोघेही गेल्याने पती खूप अस्वस्थ आहे. घटनेनंतर त्याने पोलिस ठाणे गाठून पोलिसांकडे न्यायाची याचना केली.

 

Jawale Jewellers

याबद्दल अधिक माहिती अशी कि, थायलंडच्या इसान प्रांतात राहणाऱ्या मानित नामक व्यक्तीला १ कोटी रुपयांची लॉटरी लागली होती. दरम्यान, लॉटरीचे पैसे घेऊन मानित हा घरी आला. त्याने आपल्या पत्नीला अंगकानरतला ही खूशखबर सांगितली. आता आपण यापुढे चांगले आयुष्य जगायचे असा मानस दोघांनीही केला. रात्री गप्पागोष्टी करत दोघेही झोपून गेले. मानित हा गाढ झोपेत असताना, त्याच्या पत्नीने लॉटरीचे पैसे घेऊन प्रियकरासोबत धूम ठोकली. या सर्व प्रकारानंतर मानितला मोठा धक्का बसला.

Manganga

 

दरम्यान, त्याने तातडीने पोलिसांत धाव घेत पत्नीविरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फरार पत्नीसह तिच्या प्रियकराचा शोध घेतला जात आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.