Latest Marathi News

BREAKING NEWS

“पंतप्रधान मोदी यांनी राज्यपालांची गांभीर्याने दखल घ्यावी”: अजित पवार!

0 184

मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ट्वीट करत आपला संताप व्यक्त केला आहे.

 

Jawale Jewellers

अजित पवार म्हणाले कि छत्रपती शिवरायांना आदर्श मानून महाराष्ट्र आजवर घडला, यापुढेही घडत राहील, महाराष्ट्राच्या राज्यपालपदी तीन वर्षांहून अधिक काळ राहूनही माननीय राज्यपाल महोदयांना छत्रपती शिवाजी महाराज समजत नसतील, महाराष्ट्र व महाराष्ट्राची लोकभावना कळत नसेल, तर माननीय राज्यपाल महोदयांनी पदावर राहण्याबाबत गांभीर्यानं पुनर्विचार करण्याची वेळ आली असल्याचे अजित पवार यांनी वक्तव्य केले.

Manganga

 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यपालांच्या अनावश्यक, अनाकलनीय, निंदनीय वक्तव्यांची गांभीर्याने दखल घेण्याची वेळ आली असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.