Latest Marathi News

BREAKING NEWS

व्हिडीओ: शिधापत्रिकेत ‘दत्ता’ ऐवजी लिहिले ‘कुत्ता’, पीडित व्यक्तीने केले भयंकर कृत्य!

0 289

बांकुरा: पश्चिम बंगालमध्येशिधा पत्रिकेत  तीनदा चुकीचे नाव छापल्याने पीडित व्यक्तीने अनोखे आंदोलन केले. त्याने एका सरकारी अधिकाऱ्याला रस्त्याच्या मधोमध थांबवले आणि कुत्र्यासारखे भुंकायला सुरुवात केली.

 

Jawale Jewellers

याबद्दल अधिक माहिती अशी कि, पश्चिम बंगालमधील बांकुरा येथे शिधावाटप विभागाने श्रीकांत दत्ता यांच्या आडनावाच्या जागी ‘कुत्ता’ असे लिहिले आहे. यानंतर त्या व्यक्तीने आपल्या योग्य नावाचे कागदपत्र घेऊन ते दुरुस्त करण्यासाठी सरकारी कार्यालय गाठले आणि कर्मचाऱ्यांना ते दुरुस्त करण्यास सांगितले. मात्र तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी चेष्टेने त्याला टाळले. श्रीकांत दत्ता यांनी निषेधाचा अनोखा मार्ग निवडला आणि रस्त्याच्या मधोमध सरकारी अधिकाऱ्याच्या गाडीला घेराव घालून कुत्र्यासारखे भुंकायला सुरुवात केली.

Manganga

दरम्यान, श्रीकांत दत्ता यांनी भुंकून अधिकाऱ्याकडे तक्रार दिली. प्रथम शासकीय अधिकाऱ्याला काही समजले नाही, मात्र नंतर प्रकरण समजल्यानंतर त्यांनी श्रीकांत दत्ता यांचा अर्ज त्यांच्याकडे ठेवला व चूक सुधारण्याचे आश्वासन दिले. यादरम्यान कोणीतरी गाडीला घेरले आणि भुंकण्याचा व्हिडिओ बनवला, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.