मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळाच्या बाहेर असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इथे कोश्यारींचा निषेध करण्यात आला. तर, औरंगाबाद शहरातील क्रांती चौकात रास्ता रोको करण्यात आला.
यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार म्हणाले की, काल राज्यपाल यांनी शिवाजी महाराजांबद्दल जे उद्गार काढले. अनेकवेळा असे उदगार काढले जातायत. आम्हाला सांगावे लागेल कि देशात नाही तर जगात महाराजांचा आदर केला जातो. शिवाजी महाराजांच नाव घेऊन सत्तेत आहेत. ज्या पद्धतीने व्यक्तव्यं केले जातायत म्हणून आम्ही निषेध करतोय. असे राज्यपाल आम्हाला नकोत, त्यांना हवे असेल तर त्यांच्या राज्यात जावे. आमची केंद्राकडे मागणी आहे कि त्यांना महाराष्ट्रातून त्यांची हकालपट्टी करावी. अशी वक्तव्य करणाऱ्यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, असे त्यांनी वक्तव्य केले.