Latest Marathi News

BREAKING NEWS

पॅनकार्ड व आधारकार्ड परस्परांशी लिंक करण्यासाठी ‘या’ प्रक्रिया फॉलो करा!

0 263

नवी दिल्ली : पॅनकार्ड व आधारकार्ड हे एक महत्वाचे दस्ताऐवज आहेत. हे दोन्ही कार्ड परस्परांशी लिंक करणे केंद्र सरकारने अनिवार्य केले आहे. केंद्र सरकारने या जोडणीसाठी आतापर्यंत अनेकदा मुदतवाढ ही दिली आहे. आता मार्च 2023 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.

 

Jawale Jewellers

यासाठी खालीलप्रमाणे प्रक्रिया करा:
आयकर विभागाच्या ई-फायलिंग या अधिकृत पोर्टलवर तुम्हाला जावे लागेल. लिंकिंगचा पर्याय निवडून पुढील प्रक्रिया करावी लागेल. या लिंकिंगसाठीचे विलंब शुल्क (1000रुपये) NSDL च्या संकेतस्थळावर जाऊन भरावे लागेल.

Manganga

 

विलंब शुल्क भरल्यावर आयकर विभागाच्या ई फायलिंग पोर्टलवर पुढील प्रक्रिया करता येईल. विलंब शुल्क भरल्याची नोंद त्याठिकाणी रिफ्लेक्ट होण्यास काही कालावधी लागेल. नागरिकांना किमान चार दिवस थांबावे लागेल.

 

आधार आणि पॅनकार्डावरील तुमचे व्यक्तिगत नाव, जन्मतारीख, पत्ता मोबाईल क्रमांक आदी तपशील द्यावे लागतील. हे तपशील परस्परांशी जुळत नसले, तर हे लिंकिंग होणार नाही.

 

 

आधार आणि पॅन कार्ड परस्परांशी लिंक झाले आहे की नाही याची खात्री करण्यासाठी आयकर विभागाच्या एसएमएस सुविधेचा वापर करता येईल. UIDPAN < 12 digit Aadhaar number> < 10 digit Permanent Account Number> त्यासाठी 567678 किंवा 56161 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.