Latest Marathi News

BREAKING NEWS

….तर नागरिकांचे पॅनकार्ड रद्द करण्यात येईल: आयकर विभाग!

0 753

नवी दिल्ली : पॅनकार्ड आणि  आधारकार्ड हे  महत्वाचे  दस्तऐवज आहे. हे दोन्ही कार्ड परस्परांशी लिंक करणे केंद्र सरकारने अनिवार्य केले आहे. केंद्र सरकारने या जोडणीसाठी आतापर्यंत अनेकदा मुदतवाढ ही दिली आहे. आता मार्च 2023 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. आताची मुदतवाढ ही सशुल्क आहे. त्यासाठी नागरिकांना पैसे मोजावे लागणार आहे. कारण यापू्र्वी आधारला पॅन कार्ड लिंक करण्याची 31 मार्च 2022 ही अंतिम तारीख होती.

 

Jawale Jewellers

31 मार्च ते 30 जून 2022 पर्यंत आधार कार्ड पॅन सोबत जोडण्यासाठी सध्या 500 रुपये दंड वसूल करण्यात येत होता. तर 30 जून नंतर आधार आणि पॅनकार्ड लिंक करण्यासाठी नागरिकांना 1000 रुपये मोजावे लागणार आहेत. ही मुदत ही 31 मार्च 2022 रोजी पर्यंत आहे. त्यानंतर आधारशी लिंक न करण्यात आलेले पॅनकार्ड आपोआप रद्द होतील.

Manganga

 

दरम्यान,  यासंबंधी आयकर विभागाने एक ट्विट केले आहे. त्यात 31 मार्च 2023 पर्यंत पॅन कार्ड-आधार कार्डशी न जोडल्यास नागरिकांचे पॅनकार्ड रद्द करण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.