पुणे: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याने आता मनसेनेही या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यपालांचं वय झालं आहे. त्यांना तात्काळ रिटायर करा, अशी मागणी मनसेचे नेते वसंत मोरे केली आहे.
ते म्हणाले, “एवढ्या मोठ्या उच्च पदावर असणारी व्यक्ती बेताल वक्तव्य करते. शिवाजी महाराज म्हणजे आमची अस्मिता आहेत आणि तुम्ही त्यांना एकेरी कसं बोलू शकता? मग आम्हाला देखील तुम्हाला एकेरी बोलता येतं. हे राज्यपाल नेहमी कळ लावायचं काम करतात म्हणून मी बोललो यांचं नाव बदलून कळीचा नारद ठेवा. हे कधी जातीवर बोलून भांडणे लावायचं काम करतात. तर कधी महापुरुषांवर अवमानकारक बोलतात. राज्यपालांचं वय झालं आहे त्यांना रिटायर करा, अशी मागणीही मोरे यांनी केली.
