मुंबई : भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी शिवरायांचा अतिशय वाईट शब्दात शिवरायांचा अपमान केला तरी तुम्ही शांत का? शिवरायांचा अपमान तुम्ही शांतपणे सहन कसा काय करू शकता? एकनाथ शिंदेजी जराजरी नैतिकता उरली असेल तर राजीनामा द्या, असे भाष्य करत संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
छत्रपतींबाबत राज्यपाल कोश्यारींनी पुन्हा एकदा दळभद्री विधान केलंय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखावलाय, भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपालपदावरून हटवा. नाहीतर जोडे काय असतात? आणि ते कसे मारले जातात? हे शिवसेना दाखवल्याशिवाय राहणार नाही, असे वक्तव्य राऊतयांनी केले आहे.
