मालाड: मालाड पश्चिम येथील मालवणी परिसरात मालाड मध्येएका पित्याने आपल्या ५ वर्षांचा मुलगा झोपेत असतानाच घरातील चाकूने मुलाचा गळा चिरून त्याची हत्या केली. नंदन अधिकारी असे आरोपी पित्याचे नाव आहे.

याबद्दल अधिक माहिती अशी कि, शनिवारी सकाळीच्या सुमारास आरोपीची पत्नी आपल्या 13 वर्षाच्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी गेली. मात्र, जेव्हा ती घरी आली तेव्हा तिला घराच्या फरशीवर मुलाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. तिने मदतीसाठी आरडाओरडा केल्यावर शेजाऱ्यांनी तिच्या घराकडे धाव घेतली. त्यानंतर या घटनेची माहिती मालवणी पोलिसांना दिली. मुलाची हत्या केल्यानंतर नंदन स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला आणि गुन्ह्याची कबूली दिली.
दरम्यान, या प्रकरणी मालाडच्या मालवणी पोलिस ठाण्यात नंदन विरोधात ३०२ भादवी कलमांतर्गग गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. नंदनने आपल्या मुलाची हत्या का केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.