Latest Marathi News

BREAKING NEWS

आजचे राशीभविष्य, रविवार २० नोव्हेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 680

मेष:-
घरगुती वातावरण आनंदी असेल. बोलताना आपला मुद्दा स्पष्ट मांडा. प्रेम सौख्यात वाढ होईल. रचनात्मक कार्याची चुणूक दाखवा. विवाहाची बोलणी पुढे सरकतील.

 

 

Jawale Jewellers

वृषभ:-
दिवस आपल्या आवडी प्रमाणे घालवा. आपले मानसिक आरोग्य बिघडवू नका. कुटुंबातील सदस्य चांगल्या बातम्या देतील. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. स्थावर मालमत्तेतून लाभ संभवतो.

Manganga

 

मिथुन:-
व्यापारी वर्गाने भागीदारीकडे अधिक लक्ष द्यावे. खेळ व कला यांमध्ये वर्चस्व राहील. पित्त प्रकृतीत वाढ संभवते. अनपेक्षित खर्च सामोरी येतील. मानसिक सौख्याला प्राधान्य द्या.

 

कर्क:-
काही परिवर्तन सकारात्मक ठरतील. आपले हितचिंतक पारखून घ्या. घरात टापटीप ठेवाल. डोळे झाकून कुणावरही विश्वास ठेवू नका. प्रलंबित येणी वसूल होऊ शकतील.

 

सिंह:-
आपली स्वप्ने सत्यात उतरतील. कामे मनाजोगी पार पडतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. प्रिय व्यक्तीच्या भावनांचा आदर करा. त्या प्रमाणे केलेली कृती समाधान देईल.

 

कन्या:-
मन प्रसन्न राहील. घरामध्ये शांतता नांदेल. दिवस आनंदात जाईल. कामातील बदल आनंद देईल. अधिक ऊर्जा व उत्साहाने कामे कराल.

 

तूळ:-
व्यसनाच्या आहारी जाऊ नका. आपल्या स्वत:साठी काही खर्च कराल. हितशत्रू कडे दुर्लक्ष करू नका. मानसिक आरोग्य जपावे. खर्चाचा ताळमेळ साधावा.

 

वृश्चिक:-
आवडत्या व्यक्तीची साथ मिळेल. स्वत:चे स्वत्व जपण्याचा प्रयत्न कराल. आपल्याच मतावर अडून राहाल. तुमचा रूबाब वाढेल. चारचौघांत कौतुक होईल.

 

धनू:-
अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्याच्या तक्रारींकडे लक्ष द्या. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद संभवतात. मोहाला बळी पाडू नका. कामातून आनंद शोधाल.

 

मकर:-
नोकरीमध्ये कामाकडेच पूर्ण लक्ष द्या. जिद्द व चिकाटी सोडू नका. व्यापारातील नवीन गुंतवणूक लाभदायक ठरेल. जुगारात धनलाभ संभवतो. विवाहाचे प्रस्ताव पुढे येतील.

 

कुंभ:-
घरातील वातावरण सकारात्मक असेल. खरेदीचे निर्णय लांबणीवर टाकाल. चांगल्या गोष्टीसाठी पैसे खर्च कराल. व्यवहारात गल्लत करू नका. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

 

मीन:-
व्यापारात नवीन धोरण ठरवाल. प्रलंबित येणी मिळतील. ध्येयाचा पाठलाग करा. रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. कामानिमित्त प्रवास घडेल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.