Latest Marathi News

BREAKING NEWS

आजचे राशीभविष्य, शनिवार १९ नोव्हेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 593

मेष:-
परिचितांना मदत कराल. मनात ठरवलेल्या गोष्टी तशास घडतील. विरोधकांच्या कारवायांकडे लक्ष ठेवावे. कोणाला शब्द देताना विचार करावा. आवश्यक कामे यथायोग्य पार पडतील.

 

 

Jawale Jewellers

वृषभ:-
आहारावर नियंत्रण ठेवावे. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. नवीन लोक संपर्कात येतील. व्यावसायिक उन्नती साधता येईल. भागीदारीत तुमचे वर्चस्व राहील.

Manganga

 

मिथुन:-
भावंडांचे सहकार्य मिळेल. ठरवलेल्या गोष्टीत सारखे बदल करू नका. बुद्धी चातुर्याचा वापर कराल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. मनातील इच्छा पूर्ण होईल.

 

कर्क:-
भावनांना आवर घालावा. व्यावसायिक ठिकाणी काही बदल घडून येतील. जमाखर्चाचा ताळमेळ ठेवावा.विलंबित गोष्टी मार्गी लागतील. दिवस माध्यम फलदायी असेल.

 

सिंह:-
व्यवसायात चढ उतारांचा सामना करावा लागू शकतो. आपली मनोकामना पूर्ण होईल. संयमाने परिस्थिती हाताळा. जुनी उधारी वसूल होईल. घाईने कोणतेही निर्णय घेऊ नका.

 

कन्या:-
अधिकारी वर्गाकडून कौतुक केले जाईल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. बचतीच्या योजना आखाव्यात. घरासाठी मोठी खरेदी कराल. विद्यार्थ्यांना अधिक परिश्रम घ्यावे लागतील.

 

तूळ:-
मुलांची प्रगती दिसून येईल. महत्त्वाच्या निर्णयावर तोडगा निघेल. समोरील गोष्टीत आनंद माना. कौटुंबिक खर्च वाढेल. आपल्या निर्णयावर ठाम राहा.

 

वृश्चिक:-
नवीन कार्यारंभास अनुकूल काळ. वादाचा मुद्दा पट‍वून देऊ नका. सरकारी योजनांकडे लक्ष ठेवा. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. व्यवसायात चांगल्या संधि प्राप्त होतील.

 

धनू:-
नोकरीची नवीन संधि प्राप्त होऊ शकते. मुलांकडून सुवार्ता मिळतील. आर्थिक स्थितीकडे लक्ष द्या. घरगुती मुद्दे शांततेने हाताळा. केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करा.

 

मकर:-
सामाजिक क्षेत्रात सन्मान वाढेल. विचारांना योग्य गती द्यावी. महत्त्वाच्या निर्णयापूर्वी जोडीदाराचा सल्ला घ्यावा. महत्त्वाचे निर्णय घेताना डोके शांत ठेवा. वडीलांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल.

 

कुंभ-
जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. बोलताना भान हरवू नका. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. हितचिंतकांचा सल्ला मोलाचा ठरेल. सढळ हाताने मदत करा.

 

मीन:-
गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल. प्रतिस्पर्ध्याशी सावधानतेने वागा. भावंडांशी नाते दृढ होईल. आततायीपणे निर्णय घेऊ नका. अधिकारी व्यक्तीचा सल्ला विचारात घ्या.

 

Leave A Reply

Your email address will not be published.