नागपूर : नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीत तरुणीवर अत्याचार करून त्याचा व्हिडीओ वायरल करण्याची धमकी देत दोन नातेवाईकांनी अत्याचार केला. या प्रकरणी मोहम्मद अरसलान शेख आणि मोहम्मद सरफराज या दोघांना अटक केली आहे.
माहितीनुसार, नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीत पीडित तरुणी राहते. २०२१ मध्ये पीडितेच्या मोठ्या बहिणेच्या लग्नाचे बोलणे सुरु होते. या दरम्यान आरोपी मोहम्मद अरसलान याची ओळखी पीडितेशी झाली. एक दिवस आरोपीने पीडित तरुणीवर अत्याचार केला. अत्याचाराचा व्हिडीओ वायरल करण्याची धमकी देत अनेकदा त्याने पिडीतेवर अत्याचार केला.पीडितेच्या बहिणीशी लग्नानंतरही त्याने हा प्रकार सुरूच ठेवला. या प्रकरणाची माहिती आरोपीच्या मामेभावाला समजल्यावर त्यानेही व्हिडीओ वायरल करण्याची धमकी देत अत्याचार केला.

दरम्यान, पीडित तरुणीने कुटुंबियांना माहिती दिल्यावर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी सामूहिक अत्याचाराचे गुन्हे दाखल करीत दोन्ही आरोपींना अटक केली.