नवी दिल्ली: प्रत्येक गरीब आणि गरजू व्यक्तींना दोन वेळचे जेवण मिळावे यासाठी सरकारमार्फत सर्वत्र स्वस्त धान्याची सेवा पुरवली जाते. मात्र अनेकदा रेशन दुकानदारानं फसवणूक केल्याने गरजूंपर्यंत ते अन्नधान्य पोहोचत नाही.
यात मोठ्या प्रमाणात काळाबाजार होतो. शासनाने प्रत्येक रेशन दुकानदाराला त्याच्या दुकानात इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल लावणे अनिवार्य केले आहे. याने दुकानदाराला रेशन देणे सोपे जाणार आहे. विक्रेता यात धान्य चोरून घेऊ शकत नाही. प्रत्येक रेशन दुकानात इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल बंधनकारक करण्यात आले आहे.

माहितीनुसार, शासनाने सर्व कामात पारदर्शकता यावी यासाठी कलम १२ नुसार रेशनच्या वजनात बदल केले आहेत. एनएफएसएमार्फत ८० कोटी व्यक्तींना हे धान्य पुरवले जात आहे. यात प्रत्येकास दर महिन्याला ५ किलो गहू आणि तांदूळ फक्त २ ते ३ रुपये दराने दिले जातील. नवीन नियमात रेशन विक्रेत्यांनी नागरिकांचे हक्काचे धान्य फसवणूक करून घेऊ नये, यासाठी त्यांना देखील आकर्षक मानधन दिले जात आहे. प्रती क्विंटल १७ रुपयांचा नफा विक्रेत्यांना मिळवून दिला जाणार आहे.