Latest Marathi News

BREAKING NEWS

पर्यटकांनी भरलेली व्हॅन कोसळली दरीत, १२ पर्यटकांचा जागीच मृत्यू!

0 463

उत्तराखंड: जोशीमठ येथे शुक्रवारी पर्यटकांनी भरलेली व्हॅन अचानक दरीत कोसळली. या घटनेत १२ पर्यटकांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह स्थानिकांनी दाखल होत व्हॅनमध्ये अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

 

Jawale Jewellers

याबद्दल अधिक माहिती अशी कि, जोशीमठ ब्लॉकच्या उरगम-पल्ला जाखोला हायवेवर हा अपघात झाला आहे. चालकाचं अचानक गाडीवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात असणारी व्हॅन थेट खोल दरीत कोसळली. या दुर्देवी घटनेत तब्बल १२ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये १० पुरूष आणि २ महिलांचा समावेश आहे.

Manganga

 

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. आतापर्यंत 12 मृतदेह बाहेर काढण्यात आले असूनही व्हॅनमध्ये काही लोक अडकून पडले आहेत. त्यांना रेस्कू करण्याचे काम सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.