Latest Marathi News

BREAKING NEWS

“सावरकरांच्या बाबतीत जे ऐतिहासिक सत्य आहे ते कसे नाकारता?”

0 277

शेगाव : भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रातील जनतेने मोठे प्रतिसाद आणि प्रेम दिलेलं आहे. या यात्रेत राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते , त्यावर शेगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना जयराम रमेश यांनी स्पष्ट भूमिका मांडली.

 

Jawale Jewellers

सावरकारांच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील काही पक्ष आणि संघटना नाहक वातावरण तापवत आहेत. सावरकरांच्या बाबतीत जे ऐतिहासिक सत्य आहे ते कसे नाकारता? असा सवाल उपस्थित करून भारत जोडो यात्रेचा हा एकच मुद्दा नाही. यावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. काँग्रेसने इतिहासाची मोडतोड करुन मांडणी केलेली नाही. द्विराष्ट्रवादाचा सिंद्धात सावरकर यांनीच मांडला. १९४२ च्या भारत छोडो, चले जावच्या चळवळीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विरोध केला होता. जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी हे बंगालच्या फाळणीचे कट्टर समर्थक होते व मुस्लीम लिगशी त्यांनी युती करून सरकारही स्थापन केले होते हे ऐतिहासिक सत्य आहे, असे रमेश म्हणाले.

Manganga

 

भारत जोडो यात्रेला प्रचंड समर्थन मिळत असल्याने काही लोक विरोध करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. राहुल गांधी यांच्या सुरक्षेची सर्व भारतयात्रींना चिंता आहे, परंतु त्यांच्या सुरक्षेत कसलीही तडजोड केली जाणार नाही, असे रमेश यांनी सांगितले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.