Latest Marathi News

BREAKING NEWS

“महाविकास आघाडी आणि या सरकारला अद्दल घडवणार”!

0 283

मुंबई: साखर कारखान्यांचा एफआरपीचा मुद्दा आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनाची राज्य सरकारने दखल न घेतल्याने उद्यापासून राज्यात मंत्र्यांना अडवणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे.

 

Jawale Jewellers

माहितीनुसार, राजू शेट्टी यांनी 25 नोव्हेंबर रोजी चक्का जाम करणार असून राज्यभर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे सांगितले आहे. राज्यातील जनतेने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असं आवाहनही त्यांनी केले. महाविकास आघाडी आणि या सरकारला अद्दल घडवणार. या दोन्ही सरकारसोबत आमचं काही देणे घेणे नाही. 100 खोके दिले तरी या पुढे हे सरकार येऊ देणार नाही, असं राजू शेट्टी यांनी म्हटलंय.

Manganga

 

दरम्यान, मुख्यमंत्री कोणतीच गोष्ट गांभीर्याने घेत नाहीत. हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा पूर्ववत का करत नाही. केंद्र सरकार, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देत नाही. ऊसतोड मजुरांसाठी मुकादम व्यवस्था सरकारने नष्ट केली पाहिजे, अशी मागणीही राजू शेट्टी यांनी यावेळी केली.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.