मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी हे भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. ही यात्रा इंदूरमध्ये पोहोचल्यानंतर राहुल गांधी यांना बॉम्बस्फोटानं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. इंदूरमधल्या एका मिठाईच्या दुकानात हे धमकीचे पत्र ठेवण्यात आले होते. इंदूर पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक हे पत्र ठेवणाऱ्याचा शोध घेत आहेत.
माहितीनुसार, जुनी इंदूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मिठाईच्या दुकानात राहुल गांधी यांना धमकी देणारं पत्र ठेवण्यात आलं होतं. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, अज्ञात व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.