Latest Marathi News

BREAKING NEWS

“…म्हणून वृद्ध जोडप्याचा आत्महत्येचा प्रयत्न; पत्नीचा जागीच मृत्यू!

0 312

मुंबई: मुंबईच्या बोरीवली पूर्वेकडील रत्नाकर सी एच एस टाटा पॉवर येथे राहणाऱ्या जोडप्याने आजारपणास कंटाळून झोपेच्या गोळ्या खाऊन या वृद्ध जोडप्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, यात पत्नीचा मृत्यू झाला असून पतीवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते.

 

Jawale Jewellers

दत्ताराम सुर्वे (७७ वर्षे) आणि सविता दत्ताराम सुर्वे (७६ वर्षे) हे वृद्ध दांपत्य बोरिवली पूर्वेतील रत्नाकर सी एच एस इमारतीत राहत आहे. त्याच इमारतीत त्यांचा मुलगा देखील रहात आहे. हे वृद्ध दांपत्य मागील अनेक वर्षांपासून आजारी आहे. त्यांच्यावर औषधोपचार करूनही आजारातून सुटका होत नसल्याने या वृद्ध दांपत्याने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केली यात सविता सुर्वे यांचा मृत्यू झाला असून पती दत्ताराम सुर्वे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Manganga

 

दरम्यान, दत्ताराम सुर्वे हे सध्या बोलण्याच्या स्थितीत नसल्यामुळे पोलिसांनी त्यांचा जबाब अजून नोंदवला नाही मात्र याबाबत कस्तुरबा मार्ग पोलीस ठाणे येथे अपमृत्यू कलम 174 crpc अन्वये नोंद करण्यात आला आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.