Latest Marathi News

BREAKING NEWS

आजचे राशीभविष्य, शुक्रवार १८ नोव्हेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 683

 

Jawale Jewellers

मेष:-
कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. व्यावसायिक क्षेत्रात ठाम रहा. वैवाहिक सौख्यात वाढ होईल. दिवस उत्तम रित्या व्यतीत कराल.

 

 

Manganga

वृषभ:-
आरोग्याची काळजी घ्यावी. अधिकारी वर्गाकडून कौतुक केले जाईल. जोडीदाराची प्रगती दिसून येईल. अती विचार करू नका. प्रिय व्यक्तीकडून भेट मिळेल.

 

मिथुन:-
स्वभावात करारीपणा बाळगावा. कामाच्या शैलीत बदल करावा लागेल. यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतील. बोलताना तारतम्य बाळगावे. विद्यार्थ्यानी अभ्यासावर लक्ष केन्द्रित करावे.

 

कर्क:-
अधिकारी वर्गाला नाराज करू नका. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना फलदायी दिवस. दिवस धावपळीत जाईल. घरासाठी आवर्जून काही गोष्टी कराल. खर्चाचा आकडा वाढता राहील.

 

सिंह:-
कलेतून चांगला लाभ होईल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. नवीन प्रकल्प हाती घ्याल. लोकांचा विश्वास संपादन कराल. संपूर्ण विचार केल्याशिवाय वचन देऊ नका.

 

कन्या:-
विवाहाची बोलणी पुढे सरकतील. कौटुंबिक वातावरणात अधिक रमाल. रचनात्मक कामे करता येतील. समस्यांचे निराकरण होईल. लोकांकडून चांगल्या कामाची प्रशंसा होईल.

 

तूळ:-
भविष्यातील योजनांवर काम चालू करा. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. मैत्रीचे नवीन प्रस्ताव येतील. उगाच डोक्यात राग घालून घेऊ नका. कौटुंबिक खर्चाचा ताळमेळ घालावा लागेल.

 

वृश्चिक:-
नातेवाईकांशी संपर्क साधला जाईल. दिवस धावपळीत जाईल. क्षुल्लक समस्येतून मार्ग निघेल. परंतु केलेल्या कामातून समाधान मिळेल. संमिश्र घटनांचा दिवस.

 

धनू:-
झोपेची तक्रार जाणवेल. कार्यालयीन ठिकाणी उत्तम सहकार्य मिळेल. जुन्या गैरसमजुती दूर होतील. आर्थिक स्थिती सुधारेल. प्रिय व्यक्तीकडून भेट मिळेल.

 

मकर:-
मानसिक शांतता जपावी. दिवसाची सुरवात उत्साहात कराल. भावंडांशी मतभेद संभवतात. प्रलंबित कामे मार्गी लावाल. कामा व्यतिरिक्त इतर गोष्टींकडे लक्ष देऊ नये.

 

कुंभ:-
आपल्यातील आक्रमकतेला आवर घालावा. विरोधकांकडे दुर्लक्ष कराल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. जोडीदाराच्या भावना समजून घ्याव्यात. अती तिखट पदार्थ खाऊ नयेत.

 

मीन:-
आपल्याच मतावर अडून राहू नका. मनातील गैरसमज दूर करावेत. मानसिक समतोल साधावा. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. आर्थिक स्थिती सुधारण्याचे प्रयत्न यश देतील.

 

Leave A Reply

Your email address will not be published.