मुंबई: पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांचा हृदयद्रावक मृत्यू अजूनही लोक विसरलेले नाहीत. त्यातच आता पंजाबी गायक बब्बू मानला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बंबीहा टोळीने त्याला ही धमकी दिली आहे. यानंतर पंजाबी गायक बब्बू मान याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
माहितीनुसार, बब्बू मानला बंबीहा टोळीकडून फोनवर जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. बंबीहा टोळी बब्बूला मारण्यासाठी अल्पवयीन मुलांची मदत घेऊ शकते. अल्पवयीन मुलांना हे काम करण्याचे प्रशिक्षण दिले जात असल्याचेही सांगितले जात आहे. कोणतीही गुन्ह्याची नोंद नसलेल्या अल्पवयीन मुलांना ही टोळी तयार करत आहे. या वृत्ताला पोलीस अधिकाऱ्यांकडून अद्याप दुजोरा मिळालेला नाही.
दरम्यान, पंजाबी संगीत जगतातील बब्बू मानचे पूर्ण नाव ताजिंदर सिंग बब्बू मान आहे. 29 मार्च 1975 रोजी जन्मलेला बब्बू हा एक भारतीय गायक, गीतकार, संगीत दिग्दर्शक, अभिनेता आणि चित्रपट निर्माता आहे. त्यांनी बहुतेक पंजाबी गाणी आणि चित्रपट केले आहेत तो एक खूप मोठा कलाकार म्हणून ओळखला जातो