मुंबई: अभिनेत्री मानसी नाईक आणि तिचा पती प्रदीप खरेरा याच्या वाद झाल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहेत. यातच मानसी नाईकने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यामुळे त्यांच्या दोघांमध्ये काहीतरी नक्की बिनसलं आहे असं दिसून येत आहे.
मानसी नाईक हिने काही वेळापूर्वी तिच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये तिने लिहिले आहे की, ‘आज मी माझ्या मोबाईल मधल्या काही गोष्टी डिलीट करत होते, तेव्हा प्रत्येक वेळी फोने मला विचारत होता ‘are you sure’ म्हणजे नक्की ना. मला मोठे आश्चर्य वाटले की एक निर्जीव मशीन आपल्या आत साठवलेल्या आठवणी काढून टाकण्यापूर्वी तुम्हाला नक्की ना असं विचारते. मग एक जिवंत माणूस ज्याला भावना आहेत, तो इतका निष्काळजी व भावनाशून्य कसा राहतो. जो नातेसंबंध तोडण्यापूर्वी वा तोंड फिरवण्यापूर्वी स्वतःला एकदाही विचारत नाही की ‘are you sure’ नक्की ना.’
दरम्यान, आज मानसीच्या पतीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त मानसीने स्टोरी शेअर केली. तसेच दोघांनीही त्यांच्या सोशल मीडियावरून त्यांचे फोटो आणि व्हिडिओ डिलीट केले आहेत. यामुळे तिच्या चाहत्यांना अनेक प्रश्न पडत आहेत.